Wel Come

ब्रँच विक्रम हायस्कूल,न्यू वाडदे च्या ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत..

Monday, February 20, 2017

अहंकार

आज परत एकदा नकळत
मुंगी तळ्यात पडली
स्वतःला वाचविण्यासाठी
झाडाचं पान आणि कबुतराची
वाट पाहू लागली

मीच का सतत हिला वाचवावे
हा कबुतराचा अहंकार आड आला
झाडावरच बसून
असहाय मुंगीला मरताना पाहू लागला

कबुतराने मदत करावी म्हणून
मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली
कबुतर आपल्याच विचारात मश्गुल
मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली

कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं पारधी येणार हेच विसरून गेलं. पारध्यानेही याच संधीचा फायदा घेत मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला.

कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले. झाड मात्र त्या दिवशी खूप रडले. मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच .....
पण त्याहूनही *परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*

अहंकार नाशाकडे नेतो तर

सेवा ही आनंदी जिवनाचे सार्थक ठरते.

No comments:

Post a Comment