सलाम त्या इस्रोला..सलाम त्या शास्त्रज्ञांना
शंभर नंबरी भरारी ... इस्रोकाल१५ तारखेला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पी.एस.एल.व्ही सी ३७ आकाशात उड्डाण भरले तेव्हा एक, दोन नाही तर तब्बल १०४ उपग्रह घेऊन आकाशाच्या दिशेने झेपावले. सायकल वरून पाहिलं रॉकेट ते बैलगाडीतून पहिला उपग्रह प्रक्षेपण स्थळी नेणाऱ्या इस्रो ची वाटचाल एकाच रॉकेट मधून १०० पेक्षा जास्ती उपग्रह सोडण्या इतपत झाली आहे. बुधवार जेव्हा रॉकेट ५०० किमी पृथ्वीच्या कक्षेत आपल्या कुशीतून एक एक करत उपग्रह प्रक्षेपित केले. तेव्हा आख्ख जग त्याची नोंद घेतली.
आजवर एकाच वेळेस १०० उपग्रह प्रक्षेपित करण्याच धाडस जगातील कोणत्याच देशाने केल नाही आहे. उपग्रह न्यानो असो वा मायक्रो. पण त्याला त्याच्या कक्षेत स्थापन करणे हे खूप कठीण तर आहेच पण त्याच वेळी खूप काही पणाला हि लागते. उदाहरण द्यायचं झालच तर बुधवारी पी. एस. एल. व्ही. आपल्या उदरातून १०१ उपग्रह अवघ्या ६०० सेकंदात प्रक्षेपित करेल. तब्बल २७००० किमी / तास म्हणजे एखाद्या विमानाच्या ४० पट वेगाने प्रवास करताना हे सगळे उपग्रह एकमेकांना टक्कर होऊ न देता प्रक्षेपित करणे किती गुंतागुंतीच आणि किती कौशल्य त्यात लागू शकते ह्याचा आपण एक सर्वसामान्य माणूस म्हणून विचार पण करू शकत नाही.
तीन भारताचे. त्यातील क्यार्तोस्याट-२ हा संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा उपग्रह इस्रो प्रक्षेपित करेल. ह्या उपग्रहावरील क्यामेरे अवकाशातून १ मीटर पेक्षा कमी जागेतील दृश्य टिपू शकतात. भारताच्या सीमेवरील प्रत्येक गोष्टीची माहिती हा उपग्रह खडानखडा टिपू शकतो. म्हणूनच भारताच्या सामरिक दृष्ट्रीने ह्याच महत्व अगाध आहे. चीन, पाकिस्तान अश्या देशांनी सीमेवर केलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती भारताच्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स ला लाइव बघता येणार आहेत. म्हणून ह्याला भारताच्या गरुडाचे डोळे अस संबोधल जाते आहे. ह्यासोबत भारत पहिल्यांदा २ न्यानो उपग्रह प्रक्षेपित करत आहे. न्यानो प्रकारातील उपग्रहांच्या दृष्टीने भारताचे हे पाहिलं पाउल आहे. ह्या ३ उपग्रहासोबत इस्राइल, कझाकस्थान, नेदरलँड्स, स्विझर्लंड, युनायटेड अरब अमिराती, आणि अमेरिकेचे ९६ उपग्रह प्रक्षेपित होत आहेत.
इस्रो च्या चढत्या कामगिरीचा आलेख बघून ह्या अर्थसंकल्पात २३% वाढ इस्रो च्या बजेट मध्ये केली गेली आहे. तसेच दोन महत्वाच्या मोहिमांना गो अहेड देण्यात आल आहे. त्यातील एक आहे मंगळ. जिकडे ह्यावेळेस भारत रोवर, ल्यांडर उतरवणार आहे. पाहिलं मंगळ मिशन आपण एकटच केल होत. दुसऱ्या वेळेस फ्रांस ने ह्या मोहिमेत भागीदारी उचलली आहे. भारताच्या पहिल्या मोहिमेच यश अश्या संयुक्त भागीदारीसाठी कारणीभूत आहे. दुसरी मोहीम आहे शुक्राची. शुक्र ह्या ग्रहाबद्दल आपल्याला खूप कमी माहिती आहे. ह्याचसाठी मायकल व्याटकिन्स डायरेक्टर जेट प्रपोलेशन नासा भारतात आले होते. त्यांनी सांगितलं कि भारताच्या पहिल्या शुक्र मोहिमेत भागीदारी करण्यासाठी नासा उत्सुक आहे.
१०४ उपग्रह प्रक्षेपित होतीलच पण सगळ्यात महत्वाच आहे कि अशी मोहीम राबवण्याचा विश्वास भारताला अनेक पावल पुढे घेऊन जातो आहे. पृथ्वीभोवती सध्या ११०० च्या आसपास उपग्रह फिरत आहेत. १५ फेब्रुवारी नंतर अवघ्या एका मोहिमेतून त्यात तब्बल १०% टक्क्यापेक्षा जास्ती वाढ होणार आहे. ह्यातून हे प्रक्षेपण किती महत्वाच आहे हे लक्षात येते आहे. भारताच्या ह्या वाढत्या दबदबा मुळे अमेरिकेतील अनेक प्रायवेट प्रक्षेपण करणारे चिंतेत पडले आहेत. कारण त्यांच्या लेटेस्ट टेक्नोलोजी पेक्षा हि इस्रो कडून घेण्यात येणारा उपग्रह प्रक्षेपण खर्च निम्म्याहून कमी आहे. ज्या पद्धतीने इस्रो एकामागून एक वेगळ्या मोहिमा आखत आहे त्यातून तब्बल १३५ बिलियन अमेरिकन डॉलर किंवा 9,023,926,500,000 रुपये किमतीच्या बाजारपेठेतील भारताचा हिस्सा कमालीचा वाढतो आहे. १५ फेब्रुवारीच्या मोहिमेतून अर्धा खर्च आधीच प्रक्षेपणातून इस्रो ने वसूल केला आहे. ह्यामुळे राष्ट्रीय संपत्ती ची खूप बचत झाली आहे. आता फक्त गेट सेट गो. गो फॉर इट इस्रो. खूप खूप शुभेछ्या.



No comments:
Post a Comment